Sindhudurg Exit Poll: सिंधुदुर्गमध्ये महायुतीची सत्ता, भाजपचं कमळ फुलणार; काय सांगतो साम टीव्हीचा एक्झिट पोल?

Sindhudurg Zilla Parishad: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचा विजय होण्याची शक्यता आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता येण्याचा अंदाज आहे. भाजपला सर्वाधिक २१ जागा मिळण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये महायुतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. साम टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार, भाजपला सर्वाधिक २१ जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सिंधुदुर्गमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते. जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या ८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. आता एक्सिट पोलनुसार याठिकाणी महायुतीचाच विजय होणार असल्याचा अंदाज आहे.

५० सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपला २१, शिंदेंच्या शिवसेनेला १३, ठाकरेंच्या शिवसेनाला ८ आणि मनसेला ८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला एकही जागा मिळवण्यात यश येणार नाही. ही एकतर्फी निवडणूक झाली आहे. एक्झिट पोलनुसार सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपला सत्ता मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com