Shrikant Shinde Kalyan| शिक्षकांनी असं केल्यास मतदानाची टक्केवारी वाढेल- श्रीकांत शिंदे

कल्याण पूर्वेत शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिक्षकांचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेत अजून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.

Shrikant Shinde Kalyan | कल्याण पूर्वेत शिक्षकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली होती. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिक्षकांचे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले प्रश्न राज्य सरकारमध्ये मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मार्गी लागलेत अजून शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. शिक्षक भावी पिढी घडवतात, हजारो विद्यार्थी शिक्षकांनी घडवलेले असतात, शिक्षकांचा थेट पालकांशी विद्यार्थ्यांची माजी विद्यार्थ्यांची संपर्क असतो . ते शिक्षकांचा ऐकतात त्यामुळे शिक्षकांनी अजून एक जबाबदारी घेतली पाहिजे .शिक्षकांनी मतदान वाढवण्याबाबत जबाबदारी घेतली पाहिजे असं आवाहन शिक्षकांना केलं. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी येत्या 20 तारखेला मतदान आहे. लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनी सहभागी झालं पाहिजे . मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करन्याची शिक्षकांनी जबाबदारी घेतली पाहिजे . कल्याण लोकसभा मतदारसंघात सर्वात कमी मतदान होतं ,2014 मध्ये मतदानाची टक्केवारी 42 टक्के होती 2019 मध्ये 46 टक्के झाली . मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न केले तर मतदानाची टक्केवारी अजून दहा टक्क्याने वाढल्याशिवाय राहणार नाही असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com