आंबे घेऊन जाणारी गाडी उलटून अपघात झाला.आणि रस्त्यावर सर्वत्र आंब्यांचा खच पडला.....हे आंबे पळवण्यासाठी मोठी झुंबड उडाली. कुणी पोते भरले तर कुणी अंगावरच्या कपड्यांमधून आंबे लुटून नेले. महाराष्ट्रात नेमका कुठं घडलाय हा प्रकार ? पाहूयात....
आंबं घेवून जाणाऱ्या गाडीचा झाला एक्शीडेंट... अन् झाला घोटाळा... एक्शीडेंट इतका डेंजर का पीकअपच झाली पलटी... अन् सगळ्या रस्त्यावर आंबंच आबं... घटना रिसोड - मालेगाव रस्त्यावरच्या दापुरी गावची...
आब्याची गाडी उलटली ... बातमी गावात सुसाट पसरली... अन् जनता थेट हायवेवर आली.... कुणाच्या हातात पिशवी.. तर कुणाच्या हातात गोणी... आंब गोळा करायला मागच सरकना कुणी.... कुणी आलं सायकलवर तर कुणी बाईकवर... अन् सुरु झाली आंब गोळा करायची शर्यत... प्रत्येक जण चटाचट अन् पटापट आंबं लागलं गोळा करायला... गावकऱ्यांच्या गर्दी कमी का काय त्यात भर पडली रस्त्यावरनं जाणाऱ्यांची.. गाड्या थांबवून गडी लागलं आंबा गोळा करायला... हाय नाय कुटाना...
अरं आंबं गोळा करायत करा पण कुणी तरी डायव्हर कडं तरी बघा... ज्या गाडीचा झाला एक्शीडेंट त्याच्या मदतीसाठी कुणीच पुढं येईना.. आंब्याच्या नादात माणुसकी झाली बेचव... थोडक्यात काय फुटक तीथ चिकट अन् माणुसकी बाय तू कड - कडनं सटक
वाशिम वरन् मनोज जैस्वाल, साम टीव्ही
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.