Sanjay Raut: धनुष्यबाण विकलं, हजारो कोटींचा व्यवहार; निवडणूक आयोगावर संजय राऊतांचा गंभीर आरोप

Shiv Sena symbol: शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावरून संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले. हजारो कोटींच्या व्यवहाराचा दावा करत राऊतांनी आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले.

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. निवडणूक आयोगाने आमची शिवसेना आणि धनुष्यबाण विकला असून, या संपूर्ण व्यवहारात हजारो कोटींचा आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा राऊत यांनी केला. अमित शाह यांनी या प्रकरणात दलालीची भूमिका बजावल्याचा आरोपही त्यांनी केला.

राऊत म्हणाले की, आपण जे बोलत आहोत तेच दाखवावे आणि या वक्तव्याचे परिणाम भोगण्यास आपण तयार आहोत. मोठे आमिष मिळाल्याशिवाय अशा प्रकारे घटनात्मक संस्थांकडून निर्णय होऊ शकत नाही, असा आरोप करत त्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com