शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या मुलाचा दारुण पराभव, EVM वर घेतला आक्षेप |VIDEO

Sada Sarvankar Son Loses Mumbai Civic Polls- शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर यांचा मुंबई महापालिका निवडणुकीत दारुण पराभव झाला. या निकालानंतर त्यांनी ईव्हीएम यंत्रणेबाबत आक्षेप नोंदवला असून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे.

शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलाच्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाला आहे. समाधान सरवणकर यांचा पराभव झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ते प्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचे पती आहेत. ते माहीममधून उभे होते.

प्रभाग क्रमांक 194 मधून ते उभे होते. त्यांच्या विरोधात निशिकांत शिंदे हे उमेदवार होते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये देखील सदा सरवणकर यांचा पराभव झाला होता, त्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुकीत सरवणकर कुटुंबाला अपयश आले आहे. मात्र या पराभवानंतर त्यांनी EVM मशीनवर आक्षेप घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com