शरद पवार एकनाथ शिंदेंच्या भेटीला; राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

Sharad Pawar Eknath Shinde Meeting Details: शरद पवार यांनी विधानभवनात एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस NDA सोबत जाणार का याबाबत तर्क-वितर्कांना वेग आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राजकारणात मोठ मोठ्या घडामोडी घडत असून आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानभवनात भेट घेतली. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनादरम्यान शरद पवार यांची राष्ट्रवादी ही NDA सोबत जाण्याची चर्चा सुरू आहे. जयंत पाटील आणि विनोद तावडे यांच्यामध्ये अनेक भेटी झाल्याचे देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. अशातच आज शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर राजकीय गोटात खळबळ उडाली आहे. दरम्यान या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याची अधिकृत माहिती समोर आली नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com