VIDEO: शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर पडला मोठा खड्डा, बांधकामावर प्रश्न उपस्थित

Big Pothole On Samruddhi Highway: शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर भलेमोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडणाऱ्या पुलावरची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर भलेमोठे भगदाड पडले आहे. शहापूरजवळ समृद्धी महामार्गावर हे भगदाड पडले आहे. शहापूर तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील शेरे - बावघर - शेंद्रूण गावांना जोडण्यासाठी महामार्गावर बनविण्यात आलेल्या पूलावर हे भगदाड पडले आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावरील निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महामार्गावर खड्डा पडल्याचा व्हिडीओ समोर आला असून तो व्हायरल होत आहे. पूलावर खड्डा पडल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गावर देखील भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमधील माळईवाडा इंटरचेंजजवळ महामार्गावर या भेगा पडल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com