सिंधुदुर्गातील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड समुद्रात मच्छिमारी करून बंदरात परतत असताना 'अलमका' ही पर्ससीन नौका वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे नौका बुडाल्याची घटना घडली. या नौकेवर तांडेलासह सुमारे १५ ते २० खलाशी होते. वाऱ्याचा वाढलेला वेग आणि उंच लाटांमुळे नौकेचा तोल गेला. त्यानंतर नौका समुद्रात बुडाली. मिठमुंबरी ते देवगड पवनक्कीसमोरील समुद्री पट्ट्यात ही संपूर्ण दुर्घटना घडली.
संकटात सापडलेल्या खलाशांनी मदतीसाठी हाक दिली. त्यानंतर परिसरातील स्थानिक मच्छिमार तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य यशस्वीरित्या राबवून सर्व खलाशांना सुरक्षितरित्या किनाऱ्यावर आणलं. सुदैवाने जीवितहानी टळली असून संपूर्ण नौका समुद्रात बुडाल्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झालंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.