School BUS : आणखी एक झटका, शाळेच्या बसचा प्रवास तब्बल १८ टक्क्यांनी महागला | VIDEO

School BUS fare hike : शाळेत मुलांना ने-आण करणाऱ्या बसचाही प्रवास आता महागणार आहे. त्यामुळे पालकांचे आर्थिक गणित कोलमडण्याची शक्यता आहे. आगामी आर्थिक वर्षांपासून नवे दर लागू होणार आहेत.

School BUS fare hike News : एसटी, रिक्षा, ट्रक्सीनंतर आता शालेय विद्यार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बससाठी आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. शाळेच्या बसचा प्रवास १८ टक्क्यांनी महागणार असल्याचे समोर आलेय. ‘स्कूल बस ओनर्स असोसिएशन’ने मुंबईसह राज्यात दरवाढीची घोषणा केली आहे.

शाळेच्या बसचे वाढलेले दर नव्या आर्थिक वर्षांपासून म्हणजेच एक एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहेत. या दरवाढीची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह परिवहन विभाग आणि शाळांना देण्यात आल्याचे एसबीओनं स्पष्ट केलेय. दरम्यान, जर विद्यार्थी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अवैध वाहनांवर राज्य सरकारने बंदी घातल्यास भाडेवाढ मागे घेऊयात, असेही एसबीओएने स्पष्ट केलेय.

School BUS fare hike
Maharashtra Politics : मुख्यमंत्री फडणवीस आज सुरेश धसांच्या बालेकिल्ल्यात, पंकजा मुंडेंची उपस्थिती; धनंजय मुंडे काय करणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com