Maharashtra Politics : मुख्यमंत्री फडणवीस आज सुरेश धसांच्या बालेकिल्ल्यात, पंकजा मुंडेंची उपस्थिती; धनंजय मुंडे काय करणार?

Devendra Fadnavis beed : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सुरेश धस यांच्या मतदारसंघात विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
suresh dhas news
Suresh DhasSaam tv
Published On

CM Devendra Fadnavis : मागील काही महिन्यापासून बीड जिल्ह्याची महाराष्ट्रात विविध कारणामुळे चर्चा होत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आले अन् मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर येत आहेत. आष्टी मतदारसंघात कोट्यावधींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीडमध्ये येत आहेत. आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम आयोजित कऱण्यात आलाय, या कार्यक्रमाला धनंजय मुंडे उपस्थिती दर्शवणार का? याची चर्चा बीडमध्ये सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांचा धडका लावलाय, त्यामुळे मुख्यमंत्र्‍यांच्या दौऱ्यात नेमकं काय होणार? हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे प्रथमच बीड जिल्ह्यात येत आहेत. बीडच्या आष्टी मतदार संघात शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन कामाची पाहणी, तसेच बोगदा कामाचे भूमिपूजन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते केले जाणार आहे. यावेळी विधानसभेचे सभापती राम शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह आमदार खासदारांची उपस्थिती राहणार आहे. आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम होणार आहेत. याबरोबरच श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ गड येथे देखील समाधी मंदिर बांधकामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी संत महंतांची उपस्थिती राहणार असून या दोन्ही कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे.

suresh dhas news
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचे पाय आणखी खोलात, कोर्टाची नोटीस, २० फेब्रुवारीला सुनावणी

पंकजा मुंडे उपस्थित राहणार -

काही दिवसात आमदार सुरेश धस यांच्याकडून पंकजा मुंडे यांच्यावर विविध आरोप करण्यात आले होते. या पार्श्वभूमी पंकजा मुंडे उपस्थित राहतात की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु आता पंकजा मुंडे या उपस्थित राहणार असल्याने या कार्यक्रमातील आमदार सुरेश धस व पंकजा मुंडे यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

suresh dhas news
Mumbai : मराठी माणसांचा अपमान थांबेना! ज्येष्ठ नागरिकाला हिंदीत बोलायला भाग पाडलं

आष्टी तालुक्याला मिळणार नवसंजीवनी

बीडच्या दुष्काळी आष्टी तालुक्याला नवसंजीवनी मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज आष्टी येथील खुंटेफळ साठवण तलावाचे भूमिपूजन होणार आहे. या तलावामुळे दुष्काळी आष्टी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी मिळण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. यापूर्वी दिवंगत विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, अशोक चव्हाण यांच्या नंतर मराठवाड्याला पाणी मिळाले पाहिजे, मराठवाड्यात वॉटर ग्रीड झालं पाहिजे. अशी भावना देवेंद्र फडणवीस यांची आहे. आणि याच अनुषंगाने आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा असल्याचे देखील सुरेश धस यांनी म्हटले आहे.

आष्टी तालुका हा प्रत्येक वर्षी दुष्काळाला सामोरे जातो. त्यामुळे कुंटेफळ साठवण तलावामुळे परिसरातील भागाला नवसंजीवनी मिळणार आहे. सुरेश धस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com