Marathi-speaking senior citizen faces discrimination at government exhibition
Marathi-speaking senior citizen faces discrimination at government exhibition

Mumbai : मराठी माणसांचा अपमान थांबेना! ज्येष्ठ नागरिकाला हिंदीत बोलायला भाग पाडलं

पोस्टाच्या मुंबईतील स्टॅम्प संदर्भातील साहित्याच्या प्रदर्शनात मराठी बोलल्यावरून 82 वर्षीय डोंबिवलीकर मराठी माणसाला हिंदी भाषिक अधिकाऱ्याकडून हिन वागणूक देण्यात आली. 82 वर्षीय रमेश पारखे यांनी तक्रार केली.
Published on

अभिजित देशमुख, कल्याण प्रतिनिधी

Marathi-speaking senior citizen faces discrimination at government exhibition : एका 82 वर्षीय डोंबिवलीकर नागरिकाला मराठीत बोलल्यामुळे अपमानस्पद वागणूक मिळाल्याची घटना समोर आली आहे. भारत सरकारचे पोस्ट अँड टेलिग्राफ जीपीओतर्फे आयोजित मुंबईत झालेल्या एका प्रदर्शन कार्यक्रमात ८२ वर्षीय डोंबिवलीकर रमेश पारखे गेले होते. या प्रदर्शनात साहित्य खरेदी करण्यासाठी एका काउंटर गेले असता त्यांना हिंदीतून बोलण्याची सक्ती करण्यात आली.

पारखे यांनी मी मराठीत बोलणार असे सांगितले असता त्या अधिकाऱ्यांनी आमची तक्रार कुठेही करा आमचा कोणीही काही वाकड करणार नाही, असं सांगत धुडकावून लावले. या घडल्या प्रकारानंतर पारखे यांनी याबाबत संबंधित जी.पी.ओ. पोस्ट खात्यातील अधिकाऱ्यांना पारखे यांनी लेखी तक्रार केली, असून आता याविषी राज्य सरकार काय भूमिका घेते याची पारखे वाट पाहत आहेत.

Marathi-speaking senior citizen faces discrimination at government exhibition
Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, आता दर २ मिनिटाला लोकल धावणार

डोंबिवली पूर्वेकडील राखी अपार्टमेंट मध्ये 82 वर्षीय रमेश पारखे राहतात. रमेश पारखे एलआयसीमधून अधिकारी म्हणून निवृत्त आहेत. पारखे यांना गेल्या 40 वर्षांपासून पोस्टातील स्टॅम्प्स व स्टॅम्प संदर्भातील साहित्य जमा करण्याचा छंद आहे. निवृत्तीनंतर देखील त्यांनी हा छंद जोपासलाय. भारतीय पोस्ट खात्यातर्फे महापेक्स 2025 अंतर्गत स्टॅम्पस ,फर्स्ट डे कव्हर ,स्टॅम्प संदर्भातील पुस्तक आदी साहित्याचे प्रदर्शन 22 ते 25 जानेवारी रोजी असे चार दिवस मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे भरविण्यात आले होते.

Marathi-speaking senior citizen faces discrimination at government exhibition
Cabinet Meeting : फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय, पुणे-सातारकरांना होणार फायदा!

पारखे नेहमीच अशा प्रदर्शनात जात असतात. या प्रदर्शनात डोंबिवलीकर पारखे यांना काही साहित्य खरेदी करायचे होते. त्यामुळे ते या प्रदर्शनात गेले होते. यावेळी खिडकी नंबर 32 वर असलेल्या व्यक्तीशी याविषयी मराठी भाषेत संभाषण केले असता हिंदीत बोला असे सांगण्यात आले. परंतु पारखे यांनी हिंदीत का? आपणास मराठी येत नाही का? असा प्रतिप्रश्न केला. तेव्हा हिंदीतच बोला असे सांगण्यात आले, इतकेच नाही तर माझ्याबद्दल कुठेही तक्रार करा, माझे काहीही बिघडणार नाही, मी मराठी बोलणार नाही असा तोरा केला. असा ताठर वागणुकीमळे पारखे यांनी फिला टेली ब्युरो जी पी ओ च्या वरिष्ठ अधिकार्याकडे तक्रार केली असल्याचे सांगितले. आमच्या मराठी भाषेला राज्य भाषा दर्जा मिळाला असून जर अशी वागणूक दर वेळी मिळत असेल तर न्याय कोणाकडे मागायची अशी विचारणा आता पारखे करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com