पुण्यात ब्लड सॅम्पल छेडछाड प्रकरणी ससून हॉस्पिटलचा शिपाई अतुल घटकांबळेला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार करण्यासाठी डॉ. अजय तावरे याला पैसे मिळाले होते. तावरेने आरोपीचे ब्लड सॅम्पल फेकून दिले आणि दुसऱ्याच व्यक्तीचे ब्लड सॅम्पल घेतले आणि रिपोर्ट दिला. या प्रकरणी डॉ. अजय तावरेला अटक करण्यात आली आहे. या व्यवहारात ससून हॉस्पिटलचा शिपाही अतुल घटकांबळेही होता. घटकांबळेला पोलिसांनी अटक केली आहे. वडगाव शेरीतून एका स्विफ्ट कारमधून घटकांबळेने तीन लाख रुपये आणले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.