Sanjay Raut: मराठी भाषा संदर्भात आम्ही हिंसाचार करणार काय उखाडायचे आहे उखाडा - संजय राऊत |VIDEO

Sanjay Raut Statement On Marathi Language Politics: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेचा भडिमार करत मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याचा इशारा दिला.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदर प्रहार केला आहे. ते म्हणाले, हा महाराष्ट्र आहे देवेंद्र फडणवीस हे राज्य मराठी माणसाचा आहे चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि आमच्या जात्यांनी बाप 106 हुतात्म्यांनी येथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिले नाही तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात.

आज तुम्ही राजाचे मुख्यमंत्री आहात म्हणून तुम्ही जरा गप्प आहात तुमचा मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी जाईल तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार हे आम्हाला माहिती आहे. मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची वेळ आली तर ते आम्ही होणार तुमचा कायदा तुम्ही काय मोरारजी देसाई व्हायला जात आहात का? आमच्यावर गोळ्या झाडणार आहात का? धरणार आग्रह आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह धरत नाही तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा आणि मग महाराष्ट्रावर लादा असा घणाघात संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com