वर्ध्यातील धामणगावजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातापूर्वीचा व्हिडीओ समोर आला आहे. अपघातग्रस्त वाहनात बसलेले दुर्गादेवी मंडळाचे कार्यकर्ते समृद्धीवर मागून येणाऱ्या गाडयांना हात दाखवताना दिसत आहे. वाहनात बसलेल्या एका तरुणाने हा व्हिडीओ काढला होता.
नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणण्यासाठी हे सर्व भक्त शेगाव येथे गेले होते. मूर्ती घेऊन परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. भरधाव कंटेनरने रस्त्यावरून चालणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना चिरडले. या अपघातामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातामध्ये २५ जण जखमी झाले आहेत. या अपघाताचा तपास पोलिस करत आहेत.