RSS च्या कार्यक्रमात सलमान खानची एन्ट्री; झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी, VIDEO

Salman Khan Attends RSS Centenary Event In Mumbai: RSS च्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित संवाद कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. वरळीतील नेहरू सेंटरमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संघाच्या वतीने संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून याला अभिनेता सलमान खानने हजेरी लावलीय. मुंबईतील विविध क्षेत्रातील निमंत्रित करण्यात आलेल्या मान्यवरांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत नवे क्षितिज या व्याख्यानमालेतून संबोधित करणार आहेत. वरळीच्या नेहरु सेंटर सभागृहात दोन दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला हेमा मालिनी सुभाष घई, अश्विनी भावे तसंच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com