Konkan Saam-Sakal Survey : कोकणात मविआला फटका? महायुती पुन्हा बाजी मारणार? VIDEO

Saam-Sakal Survey : सकाळ-सामच्या सर्वेक्षणात आगामी विधानसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला मोठा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोकणात महाविकास आघाडीला मोठा दणका बसला होता. आगामी विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीला मोठा फटका बसेल, असा अंदाज आहे. सकाळ-सामच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीला कोकणात तब्बल ८ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या महाविकास आघाडीला अवघ्या ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. धक्कादायक बाब म्हणजे ठाकरेंची शिवसेना या सर्व ४ जागा जिंकण्याचा अंदाज असून, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला एकही जागा जिंकता येणार नाही, असं आकडेवारीतून समोर आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com