तेंडुलकरांच्या घरी वाजणार सनई-चौघडे; सचिनसह संपूर्ण कुटुंबाने घेतली PM मोदींची भेट; दिलं लग्नाचं आमंत्रण|VIDEO

Sachin Tendulkar Invites PM Modi For Son Arjun Tendulkar Wedding: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेत अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाचं आमंत्रण दिलं. अर्जुन आणि सानिया चंडोक यांचा विवाह 5 मार्च 2026 रोजी मुंबईत पार पडणार आहे.

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ही भेट यामुळे विशेष होती कारण सचिनने त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची पत्रिका पंतप्रधानांना दिली आणि त्यांना या लग्नाला उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं. सोशल मीडियावर पोस्ट करत सचिनने पीएम मोदींच्या भेटीची माहिती दिलीय. अर्जुन तेंडुलकर आणि त्याची बालमैत्रीण सानिया चंडोक या दोघांचा साखरपुडा 13 ऑगस्ट 2025 रोजी पार पडला. तर येत्या 5 मार्च 2026 रोजी मुंबईत या दोघांचा विवाह सोहळा पार पडेल. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु आणि गृहमंत्री अमित शाह यांची ही भेट घेऊन त्यांना लग्नाचे आमंत्रण दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com