Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्ध पुन्हा भडकलं; १० भारतीयांचा मृत्यू, केंद्र सरकारची माहिती

Russia Ukraine War News : रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली. नोकरीच्या आमिषाने गेलेल्या तरुणांचा मुद्दा ऐरणीवर.
10 INDIANS KILLED IN RUSSIA UKRAINE WAR GOVERNMENT INFORMED SUPREME COURT
10 INDIANS KILLED IN RUSSIA UKRAINE WAR GOVERNMENT INFORMED SUPREME COURTSaam Tv
Published On
Summary
  • रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीयांचा मृत्यू

  • २६ जणांच्या कुटुंबीयांची सर्वोच्च न्यायालयात याचिका

  • नोकरीच्या आमिषाने फसवणुकीची शक्यता

  • परराष्ट्र मंत्रालय कुटुंबीयांच्या संपर्कात

  • परदेशी नोकरी सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Russia Ukraine War10 Indians Death News रशिया-युक्रेन युद्धात १० भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्र सरकारने शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात दिली. मृतांपैकी बहुतांश जण रशियन सैन्यात कराराच्या आधारे स्वेच्छेने सहभागी झाले होते. २६ भारतीयांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान सरकारनं ही माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती विपुल पांचोली आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. रशियात नोकरीच्या आमिषाने गेलेल्या २६ भारतीयांच्या कुटुंबीयांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक करून त्यांना युद्धात ढकलण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबियांकडून करण्यात आला आहे.

10 INDIANS KILLED IN RUSSIA UKRAINE WAR GOVERNMENT INFORMED SUPREME COURT
Crime News : कर्ज घेतल्याचा फायदा घेतला, पैसे फेडेपर्यंत महिलेवर ३ वर्षे लैंगिक अत्याचार; कोल्हापूर हादरले

केंद्र सरकारतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी न्यायालयात भूमिका मांडताना सांगितले की, याचिकेत नमूद २६ जणांपैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून परिस्थिती हाताळण्यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. काही प्रकरणांमध्ये एजंट्सकडून दिशाभूल झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी मात्र, परराष्ट्र मंत्रालयाकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप केला. यावर सरन्यायाधीशांनी या प्रकरणाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहण्याची गरज असल्याचे म्हटले. रशियात गेलेल्या सुमारे २१५ भारतीयांपैकी २६ जणांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात धाव घेतली आहे. उर्वरित प्रकरणांमध्येही मंत्रालय संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला. तसेच मृतांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याचेही सरकारने स्पष्ट केले. दरम्यान, या घटनेमुळे परदेशात नोकरीच्या आमिषाने जाणाऱ्या तरुणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. केंद्र सरकारने अशा प्रकरणांवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com