पायलटला मारलं तर सगळा विषय संपतो! अजित पवारांच्या विमान दुर्घटनेबाबत 100 टक्के घातपाताचा संशय - रोहित पवार

Rohit Pawar Alleges Sabotage In Ajit Pawar Plane Incident: अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेबाबत रोहित पवार यांनी 100 टक्के घातपाताचा संशय व्यक्त करत गंभीर आरोप केले आहेत. पायलटला लक्ष्य केल्यास सगळा विषय संपतो, असा धक्कादायक दावा करत राज्यात खळबळ उडवली आहे.

रोहित पवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक गंभीर शंका उपस्थित करत राज्यात खळबळ उडवून दिली. यावेळी त्यांनी स्क्रीनवरून विविध संशयास्पद प्रश्न मांडले.

रोहित पवार यांनी सांगितले की या प्रकरणासंदर्भात एका तज्ज्ञ व्यक्तीसोबत चर्चा झाली असून एका पुस्तकातील एका ओळीचा संदर्भ देत त्यांनी धक्कादायक दावा केला. अजित पवार यांचा अपघात खरोखरच अपघात होता का, की त्यामागे काही वेगळा कट आहे, असा दाट संशय त्यांनी व्यक्त केला. त्या पुस्तकात ‘डेगन’ नावाच्या एजंटकडून एखाद्या व्यक्तीला संपवण्याच्या पद्धतींचा उल्लेख आहे.

एखाद्याला मारायचं असेल तर सर्वात सोपा मार्ग म्हणजे चालकाला संपवणं, म्हणजेच पायलटला मारलं तर सगळा विषय संपतो, असं त्या पुस्तकात नमूद असल्याचा दावाही रोहित पवार यांनी केला. या प्रकरणावर सध्या राज्यभर चर्चा सुरू असून, हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. माझा काका गेला आहे, महाराष्ट्राचा फार मोठा नेता गेला आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा ठाम इशाराही रोहित पवार यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com