Chatrapati Sambhaji Nagar News: साम TV च्या बातमीचा दणका, पूर्णा नदीवरील पुलाचं दुरुस्तीकरण!

साम TVने प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या IMPACTमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कंत्राटदारांकडून संभाजीनगरमधील पुलाचे काम तातडीने करण्यात आले.

Chatrapati Sambhaji Nagar News: साम TVने प्रसिद्ध केलेल्या बातमीच्या IMPACTमुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कंत्राटदारांकडून संभाजीनगरमधील पुलाचे काम तातडीने करण्यात आले आहे. माणिकनगर येथील पूर्णा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजुंना खड्डे पडले होते, त्यामुळे लहान चार चाकी वाहनांना अडथळा निर्माण झाला होता. खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी होत होती. नागरिकांना होणाऱ्या या समस्येसंदर्भातली बातमी साम TV ने प्रसिद्ध केली होती. साम TV च्या बातमीने दिलेल्या दणक्यामुळे संबंधित कंत्राटदारांना जाग आली आहे. आज सकाळी बारा वाजेच्या दरम्यान पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले असून खड्ड्यात मुरूम टाकून रस्ता व्यवस्थित करण्यात आला आहे. नागरिकांच्या अडचणींचा मुद्दा उचलून धरल्याबद्दल वाहनचालकांनी साम TV चे आभार मानले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com