पूर्णेकरांच्या मुलाला पोलिसांनी घेतलं ताब्यात; रिक्षात कोंबून नेलं; ठाकरेसेना-मनसे तातडीने पोलिस ठाण्यात पोहोचले|VIDEO

Ram Purnekar Protest Outside Eknath Shinde's Residence: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात न्यायाच्या मागणीसाठी एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येमुळे गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांच्या पतीला अटक करा अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीय करत आहे. अशातच आज त्यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र एकनाथ शिंदे यांच्या शुभ-दीप या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यापूर्वीच ठाणे पोलिसांनी राम पूर्णेकर यांना ताब्यात घेतले.

पोलिस ताब्यात घेत असताना राम पूर्णेकर यांनी त्याठिकाणी टाहो फोडला, आणि त्यांना रडू कोसळले. यावेळी पोलिसांनी रडत असणाऱ्या राम पूर्णेकर यांना सावरण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांना रिक्षात एखाद्या गुन्हेगारासारखे कोंबून पोलिस ठाण्यात नेले. राम पूर्णेकर यांना पोलिसांनी ताब्यात घेताच ठाकरे गटाचे नेते केदार दिघे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com