Raj Thackeray यांची महायुती समन्वयकांची यादी जाहीर, कुणाकडे कुठली जबाबदारी?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आता मनसेकडून समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीद्वारे कोणत्या लोकसभा मतदार संघात कोणता मनसेचा पदाधिकारी किंवा नेता समन्वयक असेल, हे आता स्पष्ट झालंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आता मनसेकडून समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आलीय. या यादीद्वारे कोणत्या लोकसभा मतदार संघात कोणता मनसेचा पदाधिकारी किंवा नेता समन्वयक असेल, हे आता स्पष्ट झालंय. मनसे अध्यक्षांनी मोदींना पाठिंबा दिल्यानंतर पत्रकार परिषद घेत समन्वयकांची नेमणूक केली जाईल, असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर आता अधिकृत पत्रक जारी करत समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत मनसेच्या समन्वयकाचं नाव आणि नंबरही नमूद करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने राज ठाकरे यांच्या काही सभा या महायुतीसोबत होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महायुतीमधील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना मनसेच्या समन्वयकांसोबत मिळून काम करावं लागणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com