Raj Thackeray : सत्तेत असून मोर्चे कसले काढताय? राज ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

Raj Thackeray News : भाजप अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. अमित शाह यांच्या तेलंगणातील 'लोकशाही वाचवा' रॅलीवर सवाल उपस्थित करत त्यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. 'फक्त सत्ता मिळवून चालत नाही, तर ती सत्ता अंगातही असावी लागते. भाजप अजूनही विरोधी पक्षाच्या मानसिकतेतून बाहेर पडलेला नाही. तर काँग्रेसला विरोधी पक्ष कसा असतो, हे आता कुठे समजू लागलं आहे,' असा टोला त्यांनी लगावला. कार्टुनिस्ट अलोक यांनी ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित दिनदर्शिका तयार केली आहे. या दिनदर्शिकेचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केले.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी तेलंगणात 'लोकशाही वाचवा' रॅलीचे आयोजन केले होते. यावरून राज ठाकरे यांनी भाजपला लक्ष्य केले. तुम्ही सत्तेत आहात, मग लोकशाही वाचवण्यासाठी मोर्चे कशाला काढता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 'तुम्ही सत्तेत असताना लोकशाही वाचवा म्हणून मोर्चे काढत आहात. मग हे मोर्चे कशासाठी?' असा संतप्त प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला. यावेळी विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.