Jalgaon News: रेल्वे चढत असताना तोल गेला, तेवढ्यात कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसाची समयसुचकता अन्...; पाहा व्हिडिओ

Quick Thinking Railway Police Officer: भुसावळ रेल्वे स्टेशनवर प्रवासी ट्रेनमध्ये चढताना तोल जाऊन पडत असताना लोहमार्ग पोलीस किरण बारी यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याचे प्राण वाचवले.

जळगाव: रेल्वेत चढताना तोल जाऊन पडत असलेल्या प्रवाशाला लोहमार्ग पोलिसाने वाचवले आहे. प्रवाशाला वाचवतानाचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. किरण बारी या पोलीस कर्मचाऱ्याने प्रवाशाला वाचवले आहे.

भुसावळ-सुरत पॅसेंजरमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो खाली पडणार, तोच लोहमार्ग पोलिस कर्मचारी किरण बारी धावत जाऊन या प्रवाशाला खेचून बाहेर काढले.

जर विलंब झाला असता तर प्रवासी फलाट आणि ट्रेनच्या मध्ये गेला असता, कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी किरण बारी यांनी प्रसंगावधान दाखवले आणि क्षणाचाही विलंब न लावता या प्रवाशाचे प्राण वाचवले..

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला या रेल्वे स्थानकावर असलेले काही प्रवासी तसेच नागरिक सुद्धा धावून आले होते.. 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com