एक राजीनामा घेऊ शकत नाहीत, नरेंद्र मोदी सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान; राहुल गांधींची घणाघाती टीका

Rahul Gandhi On PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या इतिहासातील सर्वाधिक तरुणविरोधी पंतप्रधान आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.

कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवर पोलीस बळाचा वापर करण्यात आला. आंदोलक तरुणांवर लाठीमार करण्यात आला. सोनम वांगचुक यांनी या घटनेनंतर उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. देशाच्या इतिहासातील सर्वाधित तरुणविरोधी पंतप्रधान असल्याचे ते म्हणाले. मोदी एका नाकर्त्या शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेऊ शकत नाहीत, असेही ते म्हणाले.

संसदेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झाले. पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये प्रचंड गदारोळ झाला. दुसरीकडे संसदेच्या बाहेर कॉक्रोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वात तरुणाईने संसदेकडे मोर्चा काढला. या तरुण आंदोलकांवर लाठीमार करण्यात आला. आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. यावरून संतप्त झालेल्या राहुल गांधींनी केंद्र सरकारवर हल्ला चढवला. यांच्या सरकारच्या काळात पेपरफुटीच्या १५२ घटना घडल्या. यामुळे जवळपास साडेसात कोटी विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला. पण एकाही दोषीला शिक्षा मिळालेली नाही, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले.

काय म्हणाले राहुल गांधी?

मोदी हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक युवाविरोधी पंतप्रधान आहेत. ते इतके तरुणविरोधी आहेत की एक नाकर्ते शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊ शकत नाहीत. १५२ पेपर लीक. ७.५ कोटी विद्यार्थी पीडित आहेत आणि शिक्षा एका पण दोषीला नाही. शिक्षा कुणाला मिळाली, तर मेहनत करणाऱ्या तरुणांना. या तरुणांनी जेव्हा शैक्षणिक धोरणावर आवाज उठवला तेव्हा त्यांना लाठीमार आणि ताब्यात घेण्यात आलं. तर पेपर लीक करणारे आरोपी मोकाट फिरत आहेत. योग्य मुद्द्यांवर आवाज उठवणारे विद्यार्थ्यांना फरफटत नेले जाते, मारले जाते. हे सरकार या विद्यार्थ्यांवर तुटून पडले आहे, असे राहुल गांधी यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com