Pune : पुणे शिक्षक मतदारसंघात पैशांचा पाऊस? प्रत्येक शिक्षकाला १०००० रुपये दिल्याचा आरोप

Pune Teacher Election News : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत पैशांच्या कथित वाटपावरून वाद निर्माण झाला आहे. रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी उमेदवारांवर आरोप केले आहेत.

पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशांच्या कथित वापरावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी मतांसाठी पैसे वाट्ल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणामुळे निवडणुकीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. प्रत्येक उमेदवाराला १०००० रुपये दिल्याचा दावा करण्यात आला आहे. सावंत म्हणाले, गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यामध्ये पैशांचा धुडगूस घातला गेला आहे. परवाच्या दिवशी एक उमेदवार प्रति शिक्षकाला १०००० रुपये देत होता. हे सगळं निषेधार्य आहे. इतकेच नाही तर काल दुपारपासून प्रत्येक शिक्षकाला ११,००० रुपये देण्यात आल्याचा आरोप सावंतांनी केला. दरम्यान, या आरोपांमुळे राजकीय पक्षांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com