Pune : पुण्यातील हॉटेल चालकांसाठी महत्त्वाची बातमी, FDA नं जारी केले नियम

separate veg non-veg cooking, FDA rules hotels : पुण्यात हॉटेल व्यावसायिकांना व्हेज आणि नॉनव्हेज जेवण वेगळं शिजवण्याचे आदेश. अन्न सुरक्षा नियम न मानल्यास परवाना रद्द किंवा कायदेशीर कारवाईचा इशारा.

separate veg non-veg cooking, FDA rules hotels : शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची तयारी, प्रक्रिया आणि शिजवणे वेगळे करावे, असा सक्त आदेश अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा आयुक्तांनी पुण्यातील हॉटेल व्यावसायिकांना दिला आहे. अन्न सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास परवाना रद्द, दंड किंवा कायदेशीर कारवाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

अन्न सुरक्षा ही केवळ कायदेशीर बाब नसून ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित जबाबदारी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांना त्वरित नोटीस आणि कारवाईचा सामना करावा लागेल. गेल्या वर्षी राज्यातील ३० हजार हॉटेल व्यावसायिकांना अन्न सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले. यंदा एक लाख व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. नागरिकांना अन्न भेसळीच्या तक्रारी हेल्पलाइन किंवा Food Safety Connect App वर नोंदवण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

separate veg non-veg cooking, FDA rules hotels :
Helicopter Crash : देवदर्शनाआधीच काळाचा घाला, हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळमधील तिघांचा मृत्यू | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com