Pune : पुण्यातील धक्कादायक घटना, केमिकल कंपनीतील गॅस लिकेज, १७ जणांना त्रास

Pune gas leak news today : पुण्यातील गंगाधाम चौक येथे केमिकल कंपनीतून गॅस गळती झाल्याने 17 नागरिकांना श्वसनाचा त्रास झाला.

what to do during gas leakage : पुण्यातील गंगाधाम चौक, आईमाता मंदिर परिसरातील एका केमिकल कंपनीत आज सकाळी गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली. कंपनीतील एका मोठ्या टाकीतून गॅस लिकेज झाल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले आणि मोठा अनर्थ टाळला. केमिकल कंपनीतील टाकीतून मोठ्या प्रमाणात गॅस गळती सुरू झाल्याने परिसरात उग्र वास पसरला होता. याचा फटका स्थानिक नागरिकांना बसला. गॅसमुळे श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने १७ नागरिकांची प्रकृती बिघडली. त्यापैकी १४ नागरिकांना तातडीने '१०८' शासकीय रुग्णवाहिकेमार्फत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com