Pooja Khedkar News : पूजा खेडकरला दिलासा, २६ सप्टेंबरपर्यंत अटक नाहीच!
निलंबित प्रशिक्षणार्थी आयएएस (IAS) अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात आली. तसेच २६ सप्टेंबरपर्यंत पूजाला अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
पूजा खेडकर अटकपूर्व जामीन (Pooja Khedkar Pre-arrest Bail Plea) अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. न्यायालयात कालच दिल्ली पोलिसांनी स्टेटस रिपोर्ट सादर केला होता. पूजाचे अपंगत्व प्रमाणपत्र बनावट असल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. पण UPSC ने केलेल्या आरोपांत तथ्य नाही असं सांगत पूजाने सर्व आरोप फेटाळून लावले होते.
पूजा खेडकर प्रकरणी आज सुनावणीत दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) वकिलांनी युक्तिवाद केला. पूजा खेडकरने दाखल केलेले प्रमाणपत्र खोटे (Fake Certificate) असल्याचे सांगण्यात आले. अहमदनगरच्या सिव्हिल हॉस्पिटलने दिलेले ते प्रमाणपत्र नाही, असे दिल्ली पोलिसांच्या वतीने वकिलांनी सांगितले. युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने (High Court) १० दिवसांत सविस्तर तपास करण्याचे निर्देश पोलिसांना दिले. तसेच २६ सप्टेंबरपर्यंत पूजाला अटक न करण्याचेही आदेश दिले. आता या प्रकरणी २६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.