वाशिम जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एक लाख रुपयांची मदत देण्याच्या मागणीसाठी ठाकरे गट आक्रमक झाला आहे. या मागणीसाठी ठाकरे गटाच्या वतीने समृद्धी महामार्गावर मोर्चा काढण्यात येत आहे. पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असतानाही कार्यकर्ते आणि शेतकरी महामार्गाच्या दिशेने रवाना झाले आहेत.
शेलू बाजार परिसरात समृद्धी महामार्गावर जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलंय. त्याचप्रमाणे परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. आमदार नितीन देशमुख यांच्यासह ठाकरे गटाचे काही आमदारही या आंदोलनात सहभागी झालेत.
दरम्यान, पोलीस आणि आंदोलक आमनेसामने आले असून, आंदोलकांना ताब्यात घेण्याची तयारी पोलिसांकडून सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.