पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. पवारांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला. कोणतीही चिंता न करण्याची विनंतीही त्यांनी केली. शरद पवारांचे निकटवर्तीय विठ्ठल मणियार यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे.
देशाला आपण खूप वर्षे मार्गदर्शन केले आहे आणि आजही करत आहात, असे पंतप्रधान मोदी पवारांना म्हणाले. मोदी म्हणाले की, आता सुप्रिया सुळे तयार झाली आहे, आम्ही सुप्रिया देश सांभाळू; तुम्ही आम्हाला फक्त ठणठणीत राहून मार्गदर्शन करत राहा. तुम्ही प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे, अशी विनंतीही पंतप्रधानांनी केली.
पंतप्रधानांच्या या फोनमुळे आणि आदरयुक्त संभाषणाने शरद पवार भारावून व भावनिक झाल्याचे दिसून आले. तसेच पंतप्रधानांनी तब्येतीची विचारपूस केल्याबद्दल शरद पवारांनी त्यांचे मनापासून आभार मानले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.