क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची आज जयंती आहे. या जयंतीनिमित्त दिल्लीत संसदेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गाठभेट झाली. पंतप्रधान मोदी यांच्यासहित इतर नेत्यांनी या कार्यक्रमात संसदेतील प्रेरणास्थळ असलेल्या महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल देखील उपस्थित होते. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त देशभरात कार्याचे स्मरण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेबाहेर दोघांनी बराच वेळ एकमेकांशी संवाद साधला. दोघांच्या संवादाचा दुर्मिळ व्हिडिओ समोर आला. यावेळी दोन्ही नेत्यांच्या आजूबाजूला इतर नेते देखील उपस्थित होते. दोघांच्या भेटीच्या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळातही चर्चा सुरू झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.