२ लष्करी विमानांची आकाशातच धडक; ४ वैमानिकांचा मृत्यू, फर्नांडो एअरबेसजवळील घटना, VIDEO

Philippines Plane Crash : फिलिपाइन्समध्ये हवाई दलाच्या दोन विमानांची हवेतच धडक झाली. यात चार वैमानिकांचा मृत्यू झाला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फिलीपाईन्समध्ये हवाई दलाच्या दोन विमानांची हवेतच धडक झाली. या दुर्घटनेत चार वैमानिकांचा मृत्यू झाला. दोन्ही विमाने प्रशिक्षणासाठी वापरली जात होती. हवाईतळाच्या हद्दीतच हा भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, लिपान सिटीच्या फर्नांडो हवाईतळाच्या हद्दीत प्रशिक्षणासाठी वापरात असलेल्या दोन्ही विमानांची धडक झाली.

या दुर्घटनेबाबत फिलीपाईन्स हवाई दलाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेवर हवाई दलाकडून शोक व्यक्त करण्यात आला. दुर्घटनेनंतर तात्काळ रिस्पॉन्स टीम घटनास्थळी पोहोचल्या. एसएफ २६० विमानांना तात्काळ थांबवण्यात आले. आता तपासणीनंतरच या जातीच्या विमानांच्या उड्डाणाला परवानगी देण्यात येणार आहे.

स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, प्रशिक्षणावेळीच हा अपघात घडला. दोन्ही विमाने एकमेकांना धडकल्यानंतर हवाईतळाच्या हद्दीतच कोसळली. या दुर्घटनेत विमानांतील चारही वैमानिकांचा मृत्यू झाला. हवाई दलाकडून त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधण्यात आला आहे, अशी माहितीही देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com