जय,पार्थ पवार शरद पवारांच्या भेटीला; गणपती विसर्जनाच्या धामधुमीत राजकीय घडामोडींना वेग|VIDEO

Parth Pawar and Jay Pawar meet Sharad Pawar at Silver Oak: पार्थ पवार आणि जय पवार यांनी मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी शरद पवारांची भेट घेतली. गणपती विसर्जनाच्या धामधुमीत झालेल्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

एकीकडे गणपती विसर्जनाची धामधूम सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडींना वेग आला आहे. पार्थ पवार आणि जय पवार यांनी आज मुंबईतील शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. पार्थ पवार आणि जय पवार यांच्या या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी झाली, याबाबत विविध तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेटीत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांच्या आगामी निवडणुकांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, पार्थ आणि जय पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याने पवार कुटुंबातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र,या भेटीमागचे अधिकृत कारण समोर आलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com