Panvel Badlapur Tunnel : बदलापूर ते पनवेल अवघ्या २० मिनिटांत, बोगद्याचं काम पूर्ण; कधीपासून धावणार गाड्या?

Panvel Badlapur Tunnel Opening Date : पनवेल ते बदलापूर दरम्यानच्या माथेरान डोंगररांगांतील ४ किलोमीटरच्या बोगद्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन महिन्यांत मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असून प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

Panvel Badlapur Tunnel, Delhi Mumbai Expressway : दिल्ली-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या पनवेल ते बदलापूर दरम्यानच्या डोंगरातील बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे दिल्ली ते मुंबई हा २२ तासांचा प्रवास आता १२ ते १४ तासांवर येणार आहे. याचा मोठा फायदा नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी बदलापूर या शहरांना होणार आहे. यामुळे पनवेल-बदलापूर हा प्रवास फक्त ३० मिनिटात होणार आहे.

पनवेल आणि बदलापूर यांना जोडणारा सुमारे 4 किलोमीटर लांबीचा हा भुयारी मार्ग जवळपास पूर्ण झाला आहे. पुढील 2 महिन्यांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बदलापूरकरांचा मुंबई आणि नवी मुंबईकडे जाण्याचा प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचे काम वेगाने सुरू आहे. यातील एक महत्त्वाचा टप्पा असलेल्या पनवेल-बदलापूर बोगद्याचे काम पूर्णत्वास आले आहे. पनवेल आणि बदलापूर दरम्यान असलेल्या माथेरान डोंगररांगांमध्ये ४ किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात आला आहे. युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात आल्याने येत्या दोन महिन्यांत दोन्ही बोगदे वाहतुकीसाठी खुले होणार आहेत. सध्या एक बोगदा वाहतुकीसाठी सज्ज झाला असून, दुसऱ्या बोगद्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार आहे.

मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी सध्या २२ ते २४ तास लागतात; मात्र या एक्सप्रेस वेमुळे हा प्रवास १२ ते १४ तासांवर येईल. दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेचा सर्वात मोठा फायदा जेएनपीए (JNPA) बंदरात येणाऱ्या कंटेनर वाहतुकीला होणार आहे. जेएनपीए बंदरातील आयात-निर्यात यामुळे देशभरात वेगाने पोहोचण्यास मदत होईल. त्याचबरोबर सध्या नवी मुंबई, ठाणे आणि भिवंडी येथे होणारी वाहतूक कोंडी कमी होण्यासही मोठी मदत मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.