वेळप्रसंगी पालखीसमोर आडवे पडू; आळंदीत पालखी मुक्कामावरून वाद, नेमकं प्रकरण काय? VIDEO

Palkhi Tradition Row Pune Vitthal Temple Protest: पुण्यातील ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या मुक्कामाच्या परंपरेत बदल करण्याच्या प्रस्तावावरून वाद निर्माण झाला आहे. विठ्ठल मंदिर ट्रस्ट आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सागर आव्हाड, साम टीव्ही

आळंदी देवस्थान ट्रस्टकडून ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पुण्यातील मुक्कामाच्या परंपरा मोडीत करण्याचा एक प्रस्ताव समोर करण्यात आलाय. साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेल्या विठ्ठल मंदिराची पालखी सोहळा इतर कुठेही जाऊ देणार नाही. प्रसंगी आंदोलन करू चर्चा करून मार्ग काढू अशी परिसरातील राजकीय नेते आणि विठ्ठल मंदिर ट्रस्ट घेतलीय. विठ्ठल मंदिर ट्रस्ट कडून आळंदीत होणाऱ्या पालखी सोहळा बैठकीला आम्हाला निमंत्रण देण्याचे विनंती करणारे पत्र पाठवण्यात आला आहे.

पालखी सोहळ्याची आतापासून पालखी करून तयारी सुरू करण्यात आलीय. आळंदी देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन यांच्या अट्टहासापाई वेगवेगळी कारण दिली जात आहेत. आणि पालखी सोहळ्याचे महत्त्व कमी केले जात आहे. त्यामुळे या ठिकाणी पालखी सोहळा थांबणार नाही. याबाबत आम्ही जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करू वेळप्रसंगी पालखीला आडवं पडू पण पालखी याच ठिकाणी मुक्कामी राहील यासाठी प्रयत्न करू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com