Sindoor Operation: पाक संसदेत मृत दहशतवाद्यांना श्रद्धांजली; पाकिस्तानची पोलखोल|VIDEO

Pakistan Parliament: भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानी खासदारांनी पाकिस्तानचा झेंडा लपेटून श्रद्धांजली वाहिली आहे. यामुळे हे सिद्ध झाले आहे पाकिस्तानच दहशतवाद्यांना पोसत आहे.

जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्यात 26 हून अधिक भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना 22 एप्रिल रोजी घडली होती. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली होती. दहशतवाद्यांना अनेक वर्षापासून पोसत आलेल्या पाकिस्तानने यावेळी आमचा या हल्ल्याशी काही संबंध नाही अशा वलगना करत होता.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी हा देखील आमचा दहशतवाद्यांशी संबद्ध नाही असा बरळत होता. याच दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेत आज 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवाद्याना कंठस्नान केले. यामध्ये मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मसूर अजहर याच्या कुटुंबातील 14 जन ठार झाल्याच सांगितले जात आहे. मात्र, जे दहशतवादी मेले त्यांना पाकिस्तान सरकारने चक्क श्रद्धांजली वाहिली आहे. पाकिस्तानच्या खासदारांनी संसद भवनमध्ये या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहिली यामुळे पाकिस्तानचा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com