India Pakistan Tension: पाकिस्तानला सगळीकडून ठेंगा! पंतप्रधान शहबाज़ शरीफ़ आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार यांची ISI मुख्यालयात बैठक|VIDEO

Pakistan Begs for Global Support: जम्मू काश्मीरच्या पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यामुळे पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले आहे

पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि तीनही दलांमध्ये सतत बैठकीचे सत्र सुरू असल्यामुळे पाकिस्तान हा बिथरला आहे. अनेक पाकिस्तानी सैन्यातील जवानांनी थेट राजीनामा देत देश सोडून गेल्याचे वृत्त देखील समोर आले होते. तसेच आता पाकिस्तानने जागतिक स्तरावर मदतीसाठी भीक मागायला सुरुवात केली आहे. संयुक्त राष्ट्राचा बैठकीला पाकिस्तानने अनेक फ्रांस, चीन आणि इतर देशांसामोर गुडघे टेकले होते.

मात्र एकाही देशाने पाकिस्तानला भीक घातली नसून उलट कडक शब्दात सुनावल्याचे पाकिस्तानी मीडियाने दाखवले. यानंतर पाकिस्तान सरकारने तातडीने ISI मुख्यालयात बैठक आयोजित केली. या बैठकीसाठी पाकिस्तानचा पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि परराष्ट्रमंत्री इशाक दार हा उपस्थित होता. या बैठकीत पाकिस्तान देशाला कोणीही पाठिंबा द्यायला तयार नाही या पुढची रणनीती काय यावर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. एकूणच पाकिस्तान सरकारची जागतिक पातळीवर कोंडी झाली असून आता त्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com