माधव सावरगावे, साम टीव्ही
नाशिक येथील TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान हिला अखेर छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही कारवाई पार पाडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील नायगाव परिसरात सापळा रचून पोलिसांनी निदा खानला ताब्यात घेतले. हे प्रकरण समोर आल्यानंतर ती फरार होती आणि नाशिक तसेच पोलिस तिचा शोध घेत होते.
दरम्यान, आज संध्याकाळी पोलिसांनी यशस्वी कारवाई करत तिला अटक केली. अटकेनंतर पुढील चौकशीसाठी निदा खानला नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणामुळे दोन्ही शहरांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.