राजधानी दिल्लीमध्ये आंदोलन करणारे तरुण आणि लोकप्रतिनिधीवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या निषेधार्थ लोकसभेत विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच NEET पेपरफुटी आणि दिल्लीत घडत असलेल्या घडामोडींवर चर्चा करू असे मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटले. मात्र, जोपर्यंत शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत कुठल्याही मुद्द्यावर चर्चा होणार नाही असे कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ठणकावून सांगितले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच गोंधळ पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यसभेचे उपसभापति श्री हरिवंश यांनी राज्यसभेचे काम तहकूब केले. दरम्यान अधिवेशन सुरू होण्याआधी विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसद परिसरात काळे कपडे घालून निदर्शने केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.