NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण|VIDEO

NEET Re-exam 2026 Under PMO Supervision: नीट पेपरफुटीनंतर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला असून 21 जूनच्या फेरपरीक्षेचं नियंत्रण थेट पंतप्रधान कार्यालयाकडे असणार आहे. सुरक्षा वाढवण्यासाठी भारतीय हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे.

नीट पेपरफुटीच्या अभूतपूर्व गोंधळानंतर आता केंद्र सरकारने अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलाय. आगामी 21 जूनला होणाऱ्या नीट फेरपरीक्षेचं थेट नियंत्रण आता थेट पंतप्रधान कार्यालयाकडे सोपवण्यात आलं आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या परीक्षेची सुरक्षा इतकी कडक असेल की, आता प्रश्नपत्रिका पोहोचवण्यासाठी टपाल विभागाऐवजी थेट भारतीय हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत परीक्षेच्या सुरक्षेबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या पेपरफुटीच्या घटना टाळण्यासाठी कठोर यंत्रणा उभी करण्यावरही भर देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com