वारकऱ्यांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. पुणे सत्र न्यायालयाने ३०जार रुपयांच्या जात मुचलक्यावर विकास लावांडे यांचा जामीन मंजूर केला. ८ रोजी त्यांच्यावर पुण्यातील वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यांना अटक करून न्यायालयाने त्यांना येरवडा कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले होते. पण पुणे सत्र न्यायालयाने आज विकास लवांडे यांचा जामीन अर्ज मंजूर करत असताना काही अटी शर्ती सुद्धा घातल्या आहेत. चिथावणीखोर भाषण करू नये असे आदेश देखील न्यायालयाने ऑर्डरमध्ये नमूद केले आहेत. त्यांचे वकील मिलिंद पवार यांनी साम टीव्हीशी बोलताना ही माहिती दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.