दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी खळबळजक आरोप केले आहेत. सीआयडी चौकशीत व्ही. के सिंग यांनी पायलट सुमित कपूरला जबाबदार धरलं असून सिंग यांच्यामागे बोलावता धनी प्रफुल्ल पटेल आणि मंत्री राम मोहन नायडू आहेत का? असा सवाल विकास लवांडे यांनी केला आहे. तांत्रिक तपास करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न न करता संबंधित कंपन्यांची फौजदारी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. व्ही. के सिंग यांना प्रफुल्ल पटेल आणि राम मोहन नायडू यांचे मार्गदर्शन असल्याचा आरोप लवांडे यांनी केला.
अजित पवारांच्या विमान अपघाताची सीआयडीकडून सखोल चौकशी सुरू आहे. यासंदर्भात 'व्हीएसआर' कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचा धक्कादायक जबाब नोंदवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, व्ही. के सिंग यांची सलग तीन दिवस चौकशी करण्यात आली असून त्यांनी या अपघातासाठी पायलट सुमित कपूर याची चूक असल्याचे संकेत दिले आहेत. 'या प्रकरणात माझी काही चूक आढळल्यास मला कठोर शिक्षा करा.', अशी भूमिका सिंग यांनी चौकशी दरम्यान मांडल्याचे समजते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.