CJP farmer Protest News : शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि 'CJP' (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस) या संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल केलेले खटले मागे न घेतल्यामुळे शेतकरी व युवा नेत्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी नेते राकेश टिकैत आणि CJP नेत्यांच्या बैठकीनंतर आगामी १० ऑगस्ट रोजी देशभरात 'जेल भरो' आणि 'रास्ता रोको' आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी आणि तरुणांना एकत्र आणून नव्या रणनीतीनुसार हे देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. १० ऑगस्टच्या या आंदोलनामुळे देशभरातील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.