एकनाथ शिंदेंचा शिलेदार संध्याकाळी राजीनामा देणार! राज्याच्या राजकारणात भूकंप|VIDEO

Pravin Tidme Resignation From Shinde Sena Nashik: नाशिक महापालिकेतील उपमहापौरपदाच्या वादानंतर शिंदेसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे नगरसेवक व पदाचा राजीनामा देणार आहे.

नाशिकच्या महापौरपदी भाजपच्या हिमगौरी आहेर-आडके यांची निवड करण्यात आली. तर उपमहापौरपदी अचानक शिंदेसेनेचे विलास शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. उपमहापौरपदी मच्छिंद्र सानप यांनी अर्ज भरला होता. मात्र मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याने शिंदेसेनेला महापौरपद द्यावे असा आदेश नाशिकच्या भाजप श्रेष्ठींना आला. याआधीच शिंदेसेनेकडून प्रवीण तिदमे, राहुल दिवे आणि विलास शिंदे यांनी अर्ज घेतला होता. मात्र भाजप-शिंदे गटाची युती झाल्यानंतर विलास शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. परिणामी भाजपचे मच्छिंद्र सानप आणि शिंदे गटाचे प्रवीण तिदमे यांनी अर्ज मागे घेतल्याने विलास शिंदे बिनविरोध विजयी झाले.

प्रवीण तिदमे महानगरप्रमुख आणि नगरसेवकपदाचा देणार राजीनामा

या सगळ्या घडामोडीनंतर तिदमे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचे उपनेते अजय बोरस्ते आणि नवीन उपमहापौर विलास शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सोमवारी म्हणजेच आज संध्याकाळी साडेचारवाजता ते महापालिका आयुक्तांकडे नगरसेवक पदाचा राजीनामा देणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे नाशिक महानगर प्रमुख पदाचा राजीनामा देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com