Nashik News: रिक्षाचालकच झाला सैतान, विनयभंगाने केला उच्छाद, नाशिकमध्ये खळबळ|VIDEO

Woman Harassment: नाशिमध्ये दिवसागणिक गुन्हेगारी वाढतान दिसत आहे, कुंभनगरी आणि प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकमध्ये रावनांचा हैदोस वाढताना दिसत आहे.

नाशिक शहरातून रिक्षा चालकाचा पुन्हा एकदा संतापजनक प्रकार समोर आला आहे. कुख्यात गुंड असलेल्या रिक्षा चालकाने बसमधून उतरलेल्या महिलेची वाट अडवली आणि या महिलेसमोर नग्न होत अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. या घटनेने पुन्हा एकदा नाशिकमध्ये खळबळ माजली आहे. याप्रकरणी पीडित महिलांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई नाका पोलीस ठाण्यात रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे. नाशिक शहरात दिवसेंदिवस रिक्षा चालकांची हैदोसगिरी वाढताना दिसून येत आहे. नाशिक शहरात सर्राइक गुन्हेगार असलेल्या रिक्षा चालकांनी अंगावरील कपडे काढत अश्लील हावभाव करत महिलेचा विनयभंग केला या घटनेमुळे शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे हा कुख्यात गुंड असल्याचे समोर आले आहे. या आधीही याच्यावर दंगा भडकवणे तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे हा रिक्षा चालक तडीपार असून खुलेआम शहरात फिरत असल्यामुळे पोलिसांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com