

राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलेली विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघातील मतमोजणी उत्कंठावर्धक स्थितीत पोहोचलीय. नागपूर पदवीधरच्या निकालाकडे राज्याच्या नजरा आहेत. यादरम्यान मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजप उमेदवार सुधाकर कोहळे यांचा मताधिक्य 4 हजाराहून घटून केवळ 1200 मताची आघाडी राहिलीय. नितेश कराळे यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमात काँग्रेस उमेदवार ॲड अभिजीत वंजारी यांच्या मतांमध्ये वाढ झालीय. भाजपाचे सुधाकर कोहळे आघाडीवर असले तरी त्यांना विजयासाठी आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे आता दुसऱ्या पसंती क्रमासाठी नितेश कराळे यांना मिळालेल्या मतांची मोजणी सुरू झाली. या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपाच्या सुधाकर कोहळे यांची आघाडी लक्षणीयरीत्या घटली. भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यामध्ये आता केवळ १२०० मतांची आघाडी राहिलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.