Mumbai To Solapur: सोलापूरकरांसाठी खुशखबर! मुंबई-सोलापूर विमानसेवा 'या' तारखेपासून सुरू

Mumbai-Solapur Flight: १५ ऑक्टोबरपासून सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरू होणार आहे. या विमानसेवेच्या पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला येणार आहेत.

सोलापूर: सोलापूरकरांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. येत्या 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर-मुंबई विमानसेवेची सुरुवात होणार आहे. यावेळी पहिले प्रवासी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर येथे येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माहिती दिली असून, भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनीही ही बातमी माध्यमांना दिली आहे. उद्या पालकमंत्री गोरे पत्रकार परिषद घेऊन या विमानसेवेच्या अधिक माहिती पत्रकारांना देतील, असे सांगण्यात आले आहे.

सोलापूरकरांसाठी ही एक आनंदाची घटना ठरणार असून, मुंबईशी जलद संपर्कासाठी ही विमानसेवा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com