Kalyan News : दुर्गाडी किल्ल्याच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

Durgadi Fort : कल्याणमध्ये असलेला शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे.

कल्याणमध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली आहे. यावेळी कारवाईला विरोध करत नागरिकांनी घोषणाबाजी केली आहे. कल्याणमध्ये असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी भटाळे तलावात भराव टाकून उभारण्यात आलेल्या बांधकामावर अखेर आता पालिकेने कारवाई करत हातोडा चालवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या कारवाईला विरोध करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. त्यानंतर पोलिसांनी या नागरिकांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.

दुर्गाडी किल्ला हा शिवकालीन किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी समोरच्या बाजूला भटाळे तलाव आहे. त्यात भराव टाकून नागरिकांनी अनधिकृत बांधकाम केलेलं होत. त्यावर शनिवारी पालिकेच्या पथकाने कारवाई केली आहे. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली. यावेळी घोषणाबाजी करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com