Mumbai Accident: मुंबईत हिट अँड रन; शाळेत निघालेल्या ८ वर्षीय मुलीला डंपरने चिरडले, कांदिवलीत नागरिकांचा संताप, VIDEO

Mumbai Accident : मुंबईत हिट अँड रनची घटना घडली. कांदिवलीत डंपरखाली चिरडून ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

संजय गडदे, मुंबई | साम टीव्ही

मुंबईतील कांदिवलीत शाळेत निघालेल्या ८ वर्षीय मुलीचा डंपरखाली चिरडून मृत्यू झाला. कांदिवली पश्चिमेकडील गणेश नगर नाका लिंक रोडवर हा भीषण अपघात झाला. रुतिका चौहान असं अपघातात मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. भरधाव डंपरने तिला चिरडले. आज, मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास रुतिका ही शाळेत जात होती. त्याचवेळी डंपरने तिला चिरडले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला. रास्ता रोको करून या मार्गावरील वाहतूक रोखून धरली. या अपघाताच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर चारकोप पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

काही वेळाने मुलीचा मृतदेह शताब्दी रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. या अपघाताच्या घटनेनंतर डंपरचा चालक घटनास्थळावरून पसार झाला होता. वृ्त्त प्रकाशित होईपर्यंत संबंधित चालकाला अटक झालेली नव्हती. चारकोप पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com